ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाची दादागिरी चेंबूर परिसरात समोर आली आहे.आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल यांनी भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगमला त्याच्या सहकाऱ्यांसह मारहाण केली. प्रसिद्ध गायक सोनू निगम चेंबूर येथील एका कार्यक्रमात सादरीकरण करत असताना स्वप्निल फातेरपेकर यानेत्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. सोनू निगमला त्याने धक्काबुक्की केली. त्याच्या ग्रुपमधील कलाकार मंडलीला मारहाण करत त्यांना स्टेजवरून खाली ढकलले. स्वप्नील फातर्पेकर हा सोनू निगम सोबत फोटो काढन्यासाठी जबरदस्ती करत होता. त्याला नाही म्हटल्याने त्याने हा हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर स्वप्निल फातेरपेकरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोनू निगमच्या संगीत गाण्यांचा लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनू निगम हा गाण्याचे सादरीकरण करून स्टेजवरून खाली येत असतांना सोनू निगम सोबत सेल्फी घेण्यासाठी उपस्थित लोकांची झुंबड उडाली. यात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्पेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केली.या गोंधळात सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला. दरम्यान, त्याच्या अंगरक्षक आणि टीममधील काही कलाकारांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर सोनू निगमला जवळील जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. सोनू निगम सध्या सुखरूप आहे.
