आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहिलेले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता राज्यपाल पदातून पदमुक्त झाले आहे. परंतु, वादग्रस्त विधानांसह त्यांचा आणि तत्कालीन माविआ सरकार सोबत देखील संघर्ष पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नावाची यादी देऊनही कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. मात्र यावर आता पदमुक्त झाल्यावर त्यांनी भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त करण्यासाठी पत्रात धमकी दिली होती असा दावा केला आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. कोश्यारी यांनी जो दावा केला तो योग्य आहे असे फडणवीस म्हणाले आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता असेही फडणवीस यांनी सांगितले. मला मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षाचे नेते राज्यापालांना भेटायला गेले होते. त्यानंतर अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहीत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा असे राज्यपालांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरेंचा यामध्ये इगो होता. त्यामुळे त्यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
