सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेणारे कुठे आहेत? – समीर वानखेडे

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील राहिला नाही. पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदे गटाचं असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या निकालानंतर विरोधक ठाकरे गटावर अक्षरश: तुटून पडले आहेत. यात आता आयआरएस समीर वानखेडे यांची भर पडली आहे.माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत? सर्वांना माहीत आहे अशी टीका समीर वानखेडे यांनी केली आहे. सांगलीत आयोजित श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईतील शिपवर रेड झाल्यानंतर घाणेरडे राजकारणी आपल्यावर टीका करतात. यातून आमचे खच्चीकरण झाले होते. मात्र शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना धावून आली. तेव्हा आम्हाला वाटले की आपले मनोधैर्य वाढविणारे कोणीतरी आहे. आशा संघटना पाठीशी उभी राहिल्यानंतर राजकीय लोक जे बोलत होते. त्यावर लोकांचा विश्वास बसला नाही असंही ते म्हणाले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझी जात काढली. मात्र, त्यांना काही सापडले नाही. लोकांना काही काम नसते तेव्हा बाष्कळ चर्चा सुरू होते.

राजकारणात येणार का? या प्रश्नावर माजी समीर वानखेडे म्हणाले, मला देशाची, भारत मातेची सेवा करायची आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात असो. मग राजकारण हा देखील देश सेवा करण्यासाठी प्लॅटफॉर्म असू शकतो का? असे म्हणत यावर मात्र समीर वानखेडे यांनी ते काय आता काय सांगता येत नाही. असे म्हणत राजकारणात प्रवेश करण्यावर थेटपणे उत्तर देणे टाळले. मात्र अप्रत्यक्ष राजकारणात येण्याचे मूक संकेतही दिले