उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे.त्यांची एवढी वाईट स्थिती होईल, असा महाराष्ट्राने कधी विचारही केला नव्हता. सत्तेच्या लालसेपायी उद्धव ठाकरे ओवेसीकडेही जातील, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ज्या समाजवादी पक्षाने रामचरित मानस जाळलं, त्या सपाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले आहे.ओवेसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील, तर ओवेसींकडे उद्धव ठाकरे जातील. देवेंद्र फडणवीस बोलतात ते विचारपूर्वक बोलतात पुराव्यानिशी बोलतात. ते काही बोलायचं म्हणून बोलत नाहीत आणि संभ्रम निर्माण करत नाही. ते असत्य ही कधीच बोलत नाहीत. जे काही ते बोलले आहेत ते सत्यच आहे.
एखाद्या कुटुंबात जेव्हा मूल होत नाही. तेव्हा दुसऱ्याचा मूल आणून बारसं केलं जातं. संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबद्दल ठाकरे गटाचं तसंच आहे. एवढे दिवस सत्ता गाजवली. तेव्हा नामांतराचा विचार केला नाही. मात्र सत्ता जात असताना अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये देखावा केला.संभाजीनगर अशा नामांतराला एमआयएमचा आधीपासूनच विरोध होता. त्यांनी कितीही आंदोलने केली, तरी काही फरक पडत नाही. संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर व्हायलाच पाहिजे होते. एवढ्या वर्षानंतर हा लढा संपला असून जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे.अजित पवारांवर टीका करताना बावनकुळे म्हणाले आपले नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊ नये अशी भीती दादांना आहे त्यामुळे अजित पवार मध्यावधीची भाषा बोलत आहेत.
