नाना पटोले यांच्या विरोधात राजीनामासत्र स्वतःच्या जिल्ह्यातच लागली काँग्रेसला गळती

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काम करू देत नसल्याच्या आरोप करत गोंदिया जिल्हा कांग्रेस कार्याध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांनी गोंदियात काँग्रेस पक्षाला गळती लागली असुन नाना पटोले काम करु देत नसल्याच्या आरोप केला जात आहे. कॉंग्रेस कार्याध्यक्ष मोरगांव अर्जुनीचे रत्नदिप दहीवले यांनी राजीनामा दिला आहे. 30 वर्षापासून आपण कॉंग्रेसचे काम करत असतांना सुद्धा आज नाना पटोले यांच्या कारभारामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष नियुक्ती झाल्यापासून दुसऱ्या पक्षातील येणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळत नाही. नाना पटोले आपल्या जवळच्या व्यक्तींना पक्षाच्या पदावर नियुक्ती करत असून जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला आणखी गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.मला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नियुक्त दिल्यावर आम्ही जोमात काम करीत गोंदियात पक्षाला वाढीला लावले मात्र जेव्हा पासून नानां पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पासून आम्हाला काम करु देत नसल्याचा आरोप दहीवाले यानी केला आहे.