देवेंद्र फडणवीस यांच्या कट्टर शत्रुनेही केले अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत हाेत आहे. अगदी त्यांचे कट्टर शत्रु मानले जाणारे आशिष देशमुख यांनीही चांगल्या गाेष्टीचे काैतुक केले पाहिजे असे म्हणत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीस सांगितले आहे. विराेधकांना या अर्थसंकल्पावर  टीका करणेही अवघड झाल्याचे आशिष देशमुख यांच्या उदाहरणावरून दिसत आहे. गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विराेधात नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढविणारे काॅंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, हे विरोधकांना मान्य करावं लागेल. विरोधक या अर्थसंकल्पाचं स्वागत नक्कीच करतील. १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार ही मोठी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे. मी विरोधक जरी असलो, तरी ते करतो.

पीकविमाचे प्रिमियम राज्य सरकार भरणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत वाढ केली आहे. राजकीय परिस्थिती बिघडत चालली होती. पण त्यावर औषधोपचार म्हणून या बजेटकडे पाहावे लागेल. पण विमा कंपन्यांना प्रत्येक शहरात कार्यालय स्थापन करण्यासाठी सक्ती करायला पाहिजे होती. नाहीतर राज्य सरकारने हा निर्णय चांगला घेतला. पण विमा कंपन्यांनी मागचीच री ओढली तर त्याचा काही फायदा होणार नाही, असे आशिष देशमुख म्हणाले.