नाफेडकडून 24 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत 4 हजार टन कांदा खरेदी, क्विंटलला 900 रुपयांवर भाव
मुंबई : कांदा प्रश्नावरून विराेधक सरकारवर आराेप करत आहेत. मात्र, नाफेडकडून 24 फेब्रुवारी ते 5 मार्च या दरम्यान महाराष्ट्रातून तब्बल 4 हजार टन खरीप कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. क्विंटलला 900 रुपयांच्यावर भाव देण्यात आला आहे.
कांदा बाजारात स्थैर्य यावे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी लाल कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 40 केंद्रेही उभारली आहेत. बाजारात येत असलेल्या लाल कांद्याची टिकवण क्षमता जास्त नसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे विधीमंडळात सांगितले हाेते. मात्र, विराेधक खरेदी सुरू नसल्याचा आराेप करत आहेत. नाफेडने प्रत्यक्षात खरेदीची आकडेवारीच सादर केली आहे.
