मुंबई : राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलताना म्हणाले की, अतिवृष्टीमुळेही शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण कांदा उत्पादकांना यामुळे दिलासा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
