राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोर्टाच्या निर्णयावर विश्वास नाही. जेव्हा ईडीचा छापा पडला तेव्हा मुश्रीफ 52 तास फरार होते. तुम्ही काय़ केलचं नाही तर 52 तास का गायब होता ? असा सवाल भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केला. सगळ्यात वाईट म्हणजे ईडी येताच घरातील सगळे पुरुष मागच्या दरवाज्यातून फरार झाले ही सगळ्यात वाईट गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.
ते पुढं म्हणाले की, मुश्रीफांना कोर्टाच्या निर्णयावर विश्वास नाही. जेव्हा ईडीचा छापा पडला तेव्हा मुश्रीफ 52 तास फरार होते, अशी टीका केली आहे. ईडीच्या समन्सला स्टे करण्यासाठी ते कोर्टात गेले आहेत. ते त्यांच्या मर्जीने ईडी कार्यालयात गेलेले नाहीत. हायकोर्टाच्या निर्देशानुसारचं ते ईडी कार्यलयात गेले. आम्हाला अटक करायची नव्हती असा खुलासा ईडीने कोर्टात दिला. ईडी दारात आली त्यावेळी महिलांना पुढे करुन पुरूष मागच्या दाराने पुळून गेले, अशी टीका समरजितसिंह घाटगे यांनी केली हसन मुश्रीफ यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले की, 40 कोटी रुपये मुश्रीफांनी कोठे गायब केले हे समजू नये म्हणून त्यांचे चार्टर्ड अकाउंट महेश गुरव हे देखील गायब होतात. याचा अर्थ काय? हसन मुश्रीफ आरोपी नसून गुन्हेगार आहेत का? महेश गुरव सात दिवसापासून फरार आहे.तो फरार कि फरार केला यांचं उत्तर मुश्रीफ यांनी दयावे.
