एसटी कर्मचारी संस्था निवडणूक, ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीला दाखवले अस्मान

जळगाव: कष्टकरी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलला अस्मान दाखवत जळगाव एसटी कर्मचारी संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवले आहे. या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेअंतर्गत कष्टकरी जनसंघाच्या परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व एकूण १७ जागांर आपले वर्चस्व सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रतिस्पर्धी असलेले कर्मचारी महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.


महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ च्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन झाले.एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली संप करण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ला प्रकरणी सदावर्ते यांना अटकही झाली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ ही कामगार संघटना स्थापन केली.