ठाकरे राष्ट्रवादीचे गुलाम, महाराष्ट्रासाठी बंड करणाऱ्या शिंदेंना मिंधे म्हणताना लाज वाटत नाही का? जाेगेंद्र कवाडे यांचा घणाघात

ठाणे : उद्धव आणि आदित्य ठाकरे हे राष्ट्रवादीचे गुलाम झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी बंड केले. त्यांना मिंधे म्हणताना लाज वाटत नाही का? असा घणाघाती हल्ला पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी केला.
कवाड म्हणाले, – काही जण सोन्याचे चमचे घेऊन नेत्याच्या घरी पैदा झालेत.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर त्यांचा मुलगा पर्यटन मंत्री हाेताे. सत्तेसाठी त्यांनी  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. त्याविराेधात शिंदे यांचे बंड हाेते.- एकनाथ शिंदे बिनडोक असते तर कधीच तलवार चालविली असती.  पण  शिंदे बुद्धिमान आणि कर्तबगार आहेत. निर्भय आहेत. संकटाशी मुकाबला करण्यासाठी त्यांच्या मनगटात ताकत आहेत.


संजय राऊत यांच्यावर हल्लाबाेल करताना कवाडे म्हणाले, राजकारणात राजकीय कुत्रे  निर्माण झाले आहेत – भुंकण्यासाठी आणि दावणीला बांधण्यासाठी ठेवलेला हा संजय राऊत शिंदे यांना बिनडोक म्हणताे.  संजय राऊत भ्रष्टाचाराच्या आराेपावरून मध्ये जेलमध्ये होते. हा अपराधी आहे. भ्रष्टाचार केला म्हणून ईडीने तुम्हाला जेलमध्ये टाकले हे लक्षात ठेवा. त्यामुळे  संजय राऊत यांनी संयम बाळगावा.  तुम्ही सर्व खाेके खाऊन बोके झाला आहात. आता आमच्याशी गाठ आहे, असा इशारा ठाकरे गटाला देताना जोगेंद्र कवाडे म्हणाले,  एकनाथ शिंदे यांना आमचा पाठिंबा आहे.  येणाऱ्या काळात आम्ही काहीतरी करून दाखवणार. शिवशक्ती भीमशक्ती एकत्रचा नारा टिकून ठेवा. – पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्याशिवाय राहणार नाही.