माहीम तो एक Trailer है…”मजारींवरील कारवाईनंतर नितेश राणेंचा इशारा

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या दर्ग्यापासून काही अंतरावर समुद्रात नवी हाजीअली तयार केली जात असल्याचा आरोप केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत माहिमच्या समुद्रात असणाऱ्या मजारीचा उल्लेख केला होता. या मजारीभोवती दिवसाढवळ्या अनधिकृत बांधकाम केले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. महिनाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले नाही तर त्याच्या बाजूला आम्ही गणपतीचं मंदिर उभारू. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा, असं राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं होतं. त्यानंतर आज सकाळीच माहिम इथल्या मजारीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर यावर आता नितेश राणेंनी ट्वीट केलंय.

माहीम तो एक trailer है…पुरे मुबंई में साफ सफाई अभी बाकी है! हे भगवाधारींच सरकार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच हे फक्त माहिम आणि सांगलीपुरतं मर्यादित नाही. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम सुरु आहे, असा दावा नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

मुंबई हिंदू समाज 65 टक्के : एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करायचे आणि जिथे शाकाहारी लोक राहतात तिथे जाऊन बकरे कापायचे. वास सुरू झाला की जैन समाज, गुजराथी समाजाची लोक तेथील घर विकून त्यांची वस्ती बनवतात, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. मुंबई हिंदू समाज 65 टक्के आणि मुस्लिम समाज 10 टक्क्यांवरून 20 टक्के वर आल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. याचे प्रमुख कारण लँड जिहाद असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. माहीम नव्हेच तर मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा प्रकारची बांधकामे उभी राहत आहेत. राज्य सरकारने ज्या पद्धतीने पाऊल टाकले आहे तिथे मुंबई महापालिकेच्या भागात जेवढी अतिक्रमण आहेत, त्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार राणे यांनी केली.