नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर राहूल गांधींनी अनेकदा विखारी टीका केली. चौकीदार चोर है पासून अनेक घोषणा दिल्या. तरीही नरेंद्र मोदींनी कधीही त्यांना उत्तर दिले नाही. मात्र, जेव्हा माेदी आडनावाचीच बदनामी केली तेव्हा नरेंद्र माेदी नव्हे तर पूर्णेश माेदी या भाजपच्या आमदारामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी 13 एप्रिल 2019 रोजी राहुल म्हणाले होते- ‘चोरांचे आडनाव मोदी आहे. सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असते, मग तो ललित मोदी असो वा नीरव मोदी. माेदी आडनावाचीच बदनामी केली जात असल्याने भाजप आमदार पूर्णेश माेदी यांनी राहूल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. चार वर्षे हा खटला लढविला.
पूर्णेश मोदी हे कायद्याचे पदवीधर असून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. सुरतच्या अडाजन भागात कुटुंबासह राहतात. पूर्णेश मोदी 2000 ते 2005 पर्यंत सुरत महापालिकेत नगरसेवक होते. यावेळी ते पालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाचे नेते होते. याशिवाय त्यांनी 2009-12 आणि 2013-16 मध्ये सुरत शहर भाजप अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. 2013 मध्ये तत्कालीन आमदार किशोरभाई व्यंकवाला यांचे आजारपणामुळे निधन झाले. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने पूर्णेश मोदी यांना तिकीट दिले होते. तेव्हा पूर्णेश मोदी प्रचंड मतांनी विजयी झाले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
