संजय राऊतांचीही जाऊ शकते खासदारकी! दाेन वर्षांची शिक्षा असलेला गुन्हा आहे दाखल

काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांना दाेन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही दाेन वर्षांपर्यंत शिक्षा हाेऊ शकणारे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आला तर त्यांचीही खासदारकी रद्द हाेऊ शकते. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात आज संजय राऊत यांना अटक केली हाेती. ईडीने सत्र न्यायालयात  आरोप निश्चित केले आहेत. हा आर्थिक प्रकारचा गुन्हा असल्याने त्याला दाेन वर्षांची शिक्षा हाेइलच असे नाही. परंतु राऊत यांनी नुकताच एका बलात्कार पिडित मुलीचा फाेटाे ट्विट करून तिची ओळख उघड केली हाेती.

भारतीय दंड विधानानुसार बलात्कार अथवा लैंगिक छळामधील पीडीतांची ओळख ही गुप्तच ठेवावी लागले. ती उघड करता येत नाही. पीडीतांचे नाव छापणाऱ्या किंवा प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला याबाबत दोषी ठरवलं जाते. त्यासाठी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा हाेऊ शकताे. बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. संजय राऊत यांनी आरोपी मोकाट असल्याचं सांगितलं. तसेच पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो देखील ट्वीट केला होता. यामुळे अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली अशी तक्रार एका व्यक्तीने बार्शी पोलिसात दिली. त्या तक्रारीवरुन त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबराेबर या प्रकरणात पाॅक्सो 23, जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.बलात्कार प्रकरणे फास्ट काेर्टमध्ये चालतात. त्यामुळे या प्रकरणात संजय राऊत यांच्यावरील आराेप सिध्द हाेऊ शकताे. कारण त्यांनी हे ट्विट केल्याचे पुरावे आहे. त्यांनी हे ट्विट डिलीटही केलेले नाही. तसेच त्यावर खुलासाही केलेला नाही .