मुंबई : गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना निशाना करत टीका केली होती. त्यावर गेल्या 18 वर्षांपासून एकच रेकॉर्डिंग सुरु असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. यावेळी देशपांडे यांनी, ठाकरे यांना षडयंत्र करायची जणू सवय जडलेली आहे. ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात षडयंत्र केलं. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात केला. तर नारायण राणे, भाजप, मतदार यांच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसायची तुम्हाला सवय झालेली आहे तुमचा तो स्थायी भाव आहे असा हल्ला देशपांडे यांची ठाकरे यांच्यावर चढवला.
