ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा – संदीप देशपांडे

राहुल गांधी यांना झालेली शिक्षा. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. या सगळ्यावर प्रतिक्रिया येत आहेत. मनसेने राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “ज्या काँग्रेसने देशामध्ये आणीबाणी लावली. त्याला शिवसेनेच्या ठाकरेगटाने पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. आताची राष्ट्रवादी त्याच काँग्रेसचा भाग आहे. तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे काँग्रेस राष्ट्र्वादी मान्य करेल का?”, असा सवाल मनसेचे नेते, संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

संदीप देशपांडे यांनी सकाळी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. आताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच काँग्रेसचा भाग होता. हेच लोक आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत. आणीबाणी ही इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.देशपांडे म्हणाले की, “सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नक्की काय करणार?” हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं.” देशपांडे म्हणाले की, उद्या राहुल गांधी पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान करतील. मग हे काय फक्त सामनात अग्रलेख लिहिणार की घरी बसून अंडी उबवणार? नेमकं करणार काय ते त्यांनी सांगावं.