संजय राऊत मूर्ख आणि मविआची सभा कॉमेडी शो – संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राड्याला संजय राऊत यांनी राज्य सरकार पुरस्कृत दंगल असे म्हटल्याने शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहेत. संजय राऊत मूर्ख आहेत आणि महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा डायलॉगबाजी करण्यासाठी घेतलेला कॉ़मेडी शो असल्याची टीका त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीने सभा घ्यावी. त्यांना जर सभा घेण्यासाठी बंदी घातली, लोकशाहीचा गळा घोटल्या जात आहे, असा आरोप ते करतील. मुळात त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. त्यांच्या सभेत दोन-चार टोमणे आणि डायलॉग असतील. एकमेकांना डोळे मारतील. या सभेत शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हितांच काहीही बोलणार नाहीत. महाविकास आघाडीची सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो आहे”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.

संजय शिरसाट म्हणाले, ते महाविकास आघाडीच्या कॉमेडी सभेत ते एकमेकांना डोळे मारतील. या सभेत शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हिताचे काहीही बोलणार नाहीत. महाविकास आघाडीची सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो आहे. परवानगी दिली तर का दिली आणि नाही दिली तर का नाही दिली असे यांचे म्हणणे असते.