संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; लॅारेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यता आली आहे. ‘लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स… तयारी करके रखना’… असं या मॅसेजमध्ये म्हटलं आले.

खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना. अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आला आहे..