दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा माणूस सापडला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारुच्या नशेत त्या व्यक्तीने संजय राऊतांना धमकी दिली असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मात्र, हे प्राथमिक रिपोर्ट आहेत. त्यामुळं यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. कोणीही धमकी दिली असेल तर कारवाई होईल. ते आज नागपुरात बोलत होते.

महाराष्ट्रात कोणाही कोणाला धमकी देत असेल तर सरकार शांत बसणार नाही. त्या व्यक्तीवर कारवाई होईल असे फडणवीस म्हणाले. आलेल्या धमक्यासंदर्भात चेष्ठा करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही ते म्हणाले. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. हे मला माहीत आहे. मी गृहमंत्री राहिलो नाही तर बर होईल असं त्यांना वाटत आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो कि, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चार्ज दिला आहे. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पद पाच वर्षं मी सांभाळलं आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.