नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आज (०१ एप्रिल २०२३) मोदी सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ९१. ५० रुपयांनी घट केली आहे. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे. दिल्लीत आजपासून १९ किलो व्यावसायिक सिलिंडर २ हजार २८ रुपयांना मिळणार आहे. गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली असून ही कपात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्याच्या किंमतीत पूर्वीप्रमाणेच स्थिर आहेत.दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे. 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर गेल्या महिन्यात 50 रुपयांनी तर 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला होता.
