अजित पवारांना संकोच वाटू नये म्हणून… देवेंद्र फडणवीस यांचा सुसंस्कृतपणा

पुणे : पहाटेच्या शपथविधी वरून राज्यात नेहमीच चर्चा सुरू असते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण अर्धसत्यच सांगितले आहे. अद्याप पूर्ण सत्य सांगितले नाही असे म्हटले होते. याबाबत प्रश्न विचारला असता सूसंस्कृतपणा दाखवत फडणवीस म्हणाले, एखाद्याशी जमलं नाही, म्हणून त्यांना संकोच वाटेल अशा गोष्टी तुम्ही वेळोवेळी बोलू शकत नाही.

मुंबई तक या वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीबाबत पूर्ण सत्य कधी सांगणार असे फडणवीस यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखाद्याशी जमलं नाही, म्हणून त्यांना संकोच वाटेल अशा गोष्टी तुम्ही वेळोवेळी बोलू शकत नाही. राजकीय संबंध वेगळे असतात. वैयक्तिक संबंध वेगळे असतात. रोज समोरासमोर येतो. तरी महाराष्ट्रात दक्षिणेकडील राज्यासारखी परिस्थिती नाही. कट्टर वैर आपल्याकडे नाही. आम्ही एकमेकांविरुद्ध कितीही बोललो तरी एकमेकांसोबत बोलू शकतो. त्यामुळे असं वाटतं की, उरलेलं अर्धसत्य सांगण्याची वेळ येईल. ती वेळ आली की मी निश्चित सांगेन.

यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात थेट शरद पवारांशी बोलणी झाली होती. शरद पवारांना आम्ही शपथ घेणार माहीत होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला असे सांगितले होते.