मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या अपमानाची राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावे, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटायला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंना भेटायला येण्यापूर्वी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यांवर राहूल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाचवेळा अपमान राहूल गांधी यांनी केला. त्यांनी अजूनही त्यांची भूमिका बदलली नाही. अजूनही ते माफी मागण्यासाठी तयार नाहीत.
महाराष्ट्रात येण्यापूर्वी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागा आणि मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा असा इशारा बावनकुळे यांनी राहूल गांधी यांनी दिला. हिंदूस्थानात जन्मलेला व्यक्ती हा हिंदू विचारांचाय. भारतीय विचाराचाय. त्याला जर कोणी छेद देऊ नये. असेही बावनकुळे म्हणाले. इंग्रजांची माफी मागणारे सावरकर माफीवीर आहेत, असे राहूल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान म्हणाले होते.
