कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना मोठा दणका

कर्जत :कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राम शिंदे यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांना मोठा दणका दिला आहे. शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकिर यांना आपल्या पॅनेलकडून उमेदवारी दिली आहे.

ही उमेदवारी देऊन शिंदे यांनी कर्जत-जामखेडच्या राजकाराणत भूकंप घडविल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. कर्जत बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. या पॅनेलच्या उमेदवारांची शिंदे यांनी नावे जाहिर केली आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांना उमेदवारी दिली आहे.

शिंदे यांनी काकासाहेब तापकिर यांना सोसायटी मतदारसंघ (सर्वसाधारण) या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर काकासाहेब तापकिर राजकारणात पक्षीय निवडणूक नसते, असे म्हणाले आहेत. तापकिर यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकेचा आमदार रोहित पवारांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.