‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित ; जारी करणार 100 रुपयांचं नाणं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या बहुचर्चित कार्यक्रमाचा 100 वा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. हा भाग खूपच खास असणार आहे. 100 व्या भागानिमित्त सरकारने 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रजत, तांबे, निकिल आणि जस्ता या चार धातूंपासून हे 44 मिलीमीटरचं 100 रुपयांचं गोलाकार नाणं बनवण्यात आलं आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. त्याच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले असेल. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये ‘भारत’ तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘India’ असं लिहिलेलं आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल 2023 रोजी ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खूप मेहनत घेत आहे. एक लाखापेक्षा अधिक मंडळींना बूथवर 100 वा भाग ऐकता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम आणि विनोद तावडे हे मन की बात कार्यक्रमाचे प्रभारी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राज्यभर चालवला जात आहे. यासाठी भाजपने संपूर्ण टीम तयार केली आहे