मुख्यमंत्र्यांचे सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश

राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांना मुंबईत का बोलावण्यात आलं आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या बातमीनं चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार आहेत.

सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश का दिले याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या बातमीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी राज्य सरकारकडून एक पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं भवितव्य आता अधांतरी असल्याचं दिसून येतंय.