मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी कोर्लईतील बंगले गायब केले, त्यानंतर बंगल्याची फाईल गायब केली. उद्धव ठाकरे यांनी बनवा बनवी करीत फक्त जागेचे फोटो काढण्याचे आदेश दिले होते असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, रश्मी ठाकरे यांनी १२ नोव्हेंबरला बंगल्यांचा टॅक्स भरला होता. त्यांच्या बँक अकाऊंटमधून भरला गेला होता. सध्याचे फोटो, तो रिपोर्ट, ती फाईल आता गायब आहे. मी महसूल विभागात गेलो होतो तिथले अधिकारी म्हणतात फाईल आमच्याकडे नाही. मी काल मंत्रालयात ठिय्या देऊन बसलो. त्यांनी ही फाईल नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवल्याचे सांगितले. पण तिथे विचारले तर त्यांच्याकडे ही फाईल नसल्याचे सांगितल आहे. मग फाईल गेली कुठे? २ महिन्यात बंगले कुठे गेले? वर्षावरून मातोश्री वर जाताना फाईल ही गेली का? याची चौकशी ची मागणी मी केली आहे.
कोर्लईतील १९बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल झाला आहे. ठाकरेंनी १९ बंगल्यांची माहिती लपवली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
