प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सलमान खान फेल! पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत होती. भाईजानचा नवा सिनेमा येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अखेर अनेक दिवसांनंतर अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान चाहत्यांच्या भेटीस आला. ईदचं मुहूर्त साधत अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाला. पण यावेळी भाईजान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरल्याचं समोर येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने केलेल्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. पण सलमानचा सिनेमा आणखी जास्त कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जात होता.

‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असल्याने या सिनेमाकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.

सलमान खानसह या चित्रपटात पुजा हेगडे, साउथ स्टार दग्गुबती व्यंकटेश, भुमिका चावला, राघव जुयाल, जस्सी गिल, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, विनाली भटनागर, रोहिणी हट्टंगडी, विजेंदर सिंह, सतीश कौशिक, आसिफ शेख, तेज साप्रू, जगपथी बाबू या आणि इतर कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळतेय. इतके कलाकार असले तरी काही कलाकारांच्याच वाट्याला प्रभावी सीन आल्याचं दिसतं. रोहिणी हट्टंगडी, सतीश कौशिक या दिग्गज कलाकारांनी चित्रपटातील काही सीन छान खुलवलेत. या अनुभवी कलाकारांचे प्रभावी सीन पाहायला मिळतात.