विदर्भासह, मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा; सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह गारांचा जोरदार पाऊस

राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचे संकट घोंगावत आहे. सध्या राज्यात उन्हाळ्याचे दिवस आहेत. तरी सुद्धा राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून, अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडलाय. तर काही ठिकाणी सुसाट्याचा पाऊस झाला आहे. तर गाटपीटमुळं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यात आगामी काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका शेती पिकांवर होणार आहे. हवामान विभागाकडून राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडला, त्यामुळं अवकाळी पावसामुळं बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साेयगाव, पैठण, गंगापूर शहरासह काही ग्रामीण भागात बुधवारी दुपारी अचानक सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी हंगामातील बाजरी, सोयाबीन, मूग, भाईमूग, मका, तीळ, कांद्याचे नुकसान झाले. सर्वाधिक तडाखा साेयगाव तालुक्याला बसला. अामखेडा येथे घरांवरील पत्रे उडून पत्रांवरील दगड अंगावर पडल्यामुळे १३ जण जखमी झाले. फर्दापूर परिसरात ४ जण जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात बुधवारी दुपारी शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील चार दिवसांत वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेच अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात मराठवाड्यातील अनेक भागांना अवकाळीने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत. त्यातच आता पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.