मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं अन् माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पीएम केलं; सुधा मूर्तींचा व्हिडिओ व्हायरल

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे की, मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले. तसेच माझी मुलगी अक्षताने तिचा पती सुनक यांना पंतप्रधान बनवले. माझ्या मुलीमुळेच सुनक ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेत.

सुधा मूर्ती म्हणाल्या की, पुरुषाच्या आयुष्यात पत्नीचे किती महत्त्व आहे याचा हा पुरावा आहे. ती तिच्या पतीचे आयुष्य कसे बदलू शकते. माझ्या मुलीने हे सिद्ध केले आहे. सुधा मूर्ती यांच्या या विधानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुधा मूर्ती व्हिडीओमध्ये सांगत आहेत की, अक्षतामुळेच सुनकची सत्तेवरील पकड मजबूत झाली आणि ते ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. माझ्या मुलीशी लग्न केल्यानंतर सुनकचे आयुष्य खूप बदलले, असेही सुधा सांगते. आता ते खूप धार्मिक झाले असून ते दर गुरुवारी उपवासही ठेवतात. यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती या नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. नारायण मूर्ती हे देशातील प्रतिष्ठित संस्था इन्फोसिस टेक कंपनीचे संस्थापक आहेत.

ऋषी सुनक यांच्या आयुष्यात जे काही बदल झाले आहेत ते त्यांची मुलगी अक्षता यांच्यामुळे शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. लग्नानंतर सुनकचे आयुष्य खूप बदलले. सुधा मूर्ती सांगतात की, माझे पती एक प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांनी इन्फोसिस सुरू केली. मी माझ्या पतीला एक यशस्वी उद्योजक बनवले. त्याच पद्धतीने माझी मुलगी अक्षताने तिच्या पतीला ब्रिटनचे पंतप्रधान केले. केवळ पत्नीच पतीच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणते. सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या, माझी मुलगी तिच्या वडिलांप्रमाणे यशस्वी व्यवसायाचे साम्राज्य सांभाळत आहे. त्याच्याकडे खूप क्षमता आहे.

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. या दोघांचा विवाह २००९ मध्ये झाला. ऋषी सुनक हे भारतीय वंशांचे असले तरीही त्यांचं कुटुंबीय गेल्या १५० वर्षांपासून ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. लग्नानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला असल्याचंही सुधा मूर्ती यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे व कृष्णवर्णीय पंतप्रधान आहेत. खासदार झाल्यानंतर ७ वर्षांनी म्हणजे २४ऑक्टोबर २०२२ रोजी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे ४२ वर्षाचे होते. ते यूकेचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.