बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची आज पुण्यतिथी आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले होते. जे त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. त्याच्या कुटुंबासह त्यांचे चाहते त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. आज ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी कधीही न पाहिलेले फोटो शेअर करून त्यांची आठवण काढली आहे.
तीन वर्षांपूर्वी याच दिवशी ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला होता. या दुःखद बातमीने त्यांचे कुटुंब, त्यांचे चाहते तसेच त्यांना ओळखणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले.
ऋषी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आता आज, 30 एप्रिल रोजी, ऋषींच्या पुण्यतिथीनिमित्त, नीतू कपूरने एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘प्रत्येक वेळी प्रत्येक चांगल्या आठवणीत तुझी आठवण येते.’
दरम्यान, 30 एप्रिल रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त 20-25 लोकच उपस्थित राहू शकले. शर्माजी नमकीन हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता.
