छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सभेनंतर मविआची वज्रमूठ सभा बीकेसीत दि.१ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न होता.
पंरतू या सभेबद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, वज्रमूठ सभा ही बीकेसीच्या सर्वात लहान कोपऱ्यात आयोजित करण्यात आली होती. ते पाहता पुढील वज्रमूठ सभा ही एखाद्या मंगल कार्यालयात घेण्याची वेळ मविआवर येईल, असा टोला मविआच्या सभेवर नितेश राणेंनी मविआच्या सभेवर लगावला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कालच्या सभेत मुस्लिम बांधवाना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. ती लवकरच बाहेर काढेन.उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल. असे नितेश राणे म्हणाले.
आपल्या बॉडीगार्डच्या माध्यमातून खोके कसे पोचवले. आमच्याकडे सुद्धा राजपूत बॉडीगार्ड कसे खोके पोचवतो कॉल रेकॉर्ड आहेत. उद्धवजी सकाळच्या कामगाराला गप्प करा. उगाच मोहित कंबोजच्या नादाला लागू नकोस. आदित्य आणि तेजस यांचं नाईट लाईफ समोर येईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
‘केरला स्टोरी’ हा सिनेमा सत्यता सांगणारा आहे. आज मी सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहे आणि हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी केली आहे. हिंदू महिलांची सत्य स्थिती चित्रपटातून समोर येईल, असंही राणे म्हणालेत.
