शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलं मात्र शब्द फिरवला

राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या नटसम्राट सारख्या नाट्यमय घडामोडीवर एकदाचा पडदा पडला. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या प्रकरणावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सवयीप्रमाणे शरद पवार यांनी आपला शब्द फिरवला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी लावून धरली. अखेर काल 5 मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार साहेबांनी म्हटल्या प्रमाणे भाकर फिरवायला पाहिजे होती. मात्र त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे निर्णय फिरवला आहे.

राज्यात सर्वप्रथम महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते सरकारी वाळू ठेक्याचे उदघाटन झाले

राज्यात प्रथमच अहमदनगरच्या नायगाव इथे या सरकारी ठेक्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं यापुढे सरकारी ठेक्यामार्फत रास्त भावांमध्ये वाळू धोरण हे शासनाने सुरु केलं आहे.

उद्धव ठाकरे बारसूत शेतकऱ्यांशी संवाद

उद्धव ठाकरे हे बारसू इथल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज दौरा करत आहेत. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते ते म्हणाले नाणार प्रकल्पावेळी त्यांची वेगळी भूमिका होती, आता वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका नेहमीच बदलत असते. मात्र स्थानिकांच्या काय भावना आहे हे लक्षात घेऊन याबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा करत आहे.बारसू प्रकल्पाला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रकार होत आहे अस राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले

सध्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचं आयोजन केलं जातं. यासाठी आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजनमधून निधी देण्याचा आमचा विचार असल्यास राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगार निर्मितीसाठी अशा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी प्रशिक्षित होतील, अशी अपेक्षा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.