लोकसभा निवडणूक ही आता जवळ येत आहे.1 वर्षभरात खासदारकिची निवडणूक जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यावरून राज्यातील भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडितील तिन्ही पक्ष कामाला लागले आहे. जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये चर्चा आणि बैठकांना उत आला आहे. तर युती आणि आगाडीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षबांधणीसह नव्या जुन्या उमेदवारांना मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. याचदरम्या शिरूर मतदारसंघात बैठकीपूर्वीच ट्विस्ट आला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार विलास लांडे यांनी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरुर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर लागेल आहेत. ज्यावर भावी खासदार असा उल्लेख आणि संसदेचा फोटोही पाहायला मिळतोय.
तर दुसरीकडे शिरूर मतदार संघातून यंदा खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेचे तिकीट मिळेल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र दिलीप वळसे पाटील सध्या परदेशात असल्यामुळे यावर 5 जून रोजी चर्चा होईल अशी माहिती आहे. तर माढ्यातून संजीव राजे नाईक निंबाळकर इच्छुक आहेत.
अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचे काही बॅनर पाहायला मिळत आहेत. यामुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानेच दंड थोपटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले आहेत. या बॅनर्सवर विलास लांडे यांना भावी खासदार संबोधण्यात आलं आहे आणि तसंच संसदेचा फोटोही दिसून येत आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील माजी आमदार विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. अमोल कोल्हे सध्या राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
