मुंबईत अनधिकृत बांगलादेशी वाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मालवणी मालाड पश्चिम परिसरात बांग्लादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
शिबिरात ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या कुर्ला पश्चिम एल वॉर्डातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती साधन शिबिर कार्यक्रमात २९ मे रोजी ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी 130 तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. उर्वरित तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या. यावेळी कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
मालवणी मालाड पश्चिम परिसरात बांग्लादेशी नागरिक अवैधरित्या स्थलांतर करीत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्याची दखल घेत मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी बांग्लादेशी फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या थाटलेल्या दुकानांचाही प्रश्न चर्चेला आला होता. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनी दिले होते.त्यानुसार, मालवणी मालाड पश्चिम परिसरात बांग्लादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील ६ हजार चौरस मीटर जागा मोकळी झाली आहे. या जागेवर खेळाचे मैदान तयार केले जाणार आहे.
