मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला फक्त 22 जागा ; नितेश राणेंची ठाकरे गटावर टीका

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी उद्धव ठाकरेंचे थेट अरे- तुरे असा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असा महाविकास आघाडीचा सर्वे आल्याचा दावा देखील केला आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर देखील तोंडसूख घेतले.

राज्य सरकारकडून 50 लाखांचा जाहिरातीचा बिझनेस सामना घेत आहे. मुंबई महापालिकेकडून आजही सर्वात जास्त सामनाला जाहिरातीतून निधी दिला जातोय. त्यामुळे हे कोणत्या आधारावर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांनी रेल्वे स्पॉट क्लीन होईपर्यंत ठिकाण सोडलं नाही. त्यामुळे हे कोणत्या आधारावर नैतिकतेच्या गोष्टी करत आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले.

ओडीसामधल्या अपघातावर आजच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. त्यावर, ओडीसा अपघाताबद्दल सामनामध्ये आणि आज पत्रकार परिषदेत गरळ ओकण्याचा काम केलं आहे. सामना वृत्तपत्र राज्य सरकारकडून 50 लाखांची जाहिराती घेतं.महापालिकेत सर्वात जास्त जाहिराती यांच्या पेपरला जातात. सरकारी तुकड्यावर जगणाऱ्यांनी हे बोलणं उचित नाही, असं नितेश राणे म्हणालेत.

नैतिकतेची भाषा करतात. मग तुमच्या मालकाच्या सरकारमध्ये लोकांचे जीव गेले तेव्हा पश्चताप झाला का?आमचे रेल्वे मंत्री तिथं रात्रभर होते. ते चांगलं काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुझ्या मालकाने काय केलं सांग. यांचे मालक परदेशीं फिरत आहेत. तेही कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशापासून… दुसऱ्यांना नैतिकता शिकवता मालकाने कधी राजीनामा दिला का? , असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे. खरी शिवसेना दिल्लीत जात नाही म्हणता मग तुमचा मालक जनपथवर किती वेळा गेला? दिल्लीला मातोश्रीची मम्मी आहे का? सीबीआय चौकशीवर बोलता मग श्रीधर पाटणकरबद्दल बोला ना, असं आव्हानच राणेंनी दिलंय.