“विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेत, यावर स्पष्ट करतो, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता?” असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विचारला. “राहुल गांधी सोबत भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले, हे कोणत्या तत्वात बसते. तुम्हाला न बोलवता तुम्ही गेलात, त्यामुळे तुम्ही मातोश्रीची किंमत घालवली” अशी टीका संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली.
संजय शिरसाट म्हणाले, सिल्व्हर ओकवर तुम्ही जात आहात कारण तुम्हाला माहिती आहे, शरद पवारांची तेवढी ताकद आहे. तुमच्यावरील संकट ते निवारू शकतात हा विश्वास तुम्हाला आहे, म्हणून तिकडे जाता. संजय राऊतने पवारांच्या सांगण्यावरून ही फाटाफूट केली आहे. हे आमचं ठाम मत आहे. तरीसुद्धा हे लोक आम्हाला नितीमत्ता शिकवत आहेत. मुळात यांचा नेता कोण आहे हे यांनी सांगावं.
अजित पवार म्हणाले, तुम्ही मोठे नेते आहात. म्हणजे काय, त्यांना तुम्हाला बोलायचे नाही. असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा अजित पवारांनी त्यांना लायकी दाखवली, तेव्हा संजय राऊतांची भाषा बददली, असा घणाघात संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊतांवर केला.
शरद पवारांच्या सांगण्यावरून ही फाटाफूट केलेली आहे. असे माझे ठाम मत आहे, असे शिरसाट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले संजय राऊत आम्हाला विचारतात की, त्यांचा नेता कोण आहे. त्यावर शिरसाट म्हणाले की, खऱ्या अर्थाने तुम्हाला नेत्याची गरज आहे. कारण, संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभेत ठाकरेंची लायकी अन्य नेत्यांनी काढली. ते म्हणाले की, तुमची लायकी आमच्यापेक्षा मोठी नाही, हे वज्रमूठ मधील नेत्यांनी सांगितले की, तुम्हाला सभा घ्यायची असेल तर आमच्यासोबत बसावे लागेल. तेव्हा तुमचा अभिमान कुठे गेला? एकेकाळी मोदी, अमित शहा मातोश्रीवर येत होते. राष्ट्रपतींचे उमेदवार देखील मातोश्रीवर नमन करत असत. मात्र, आता तुम्हाला सिल्वर ओकवर जावे लागते. तेव्हा तुमचा अभिमान गहाण ठेवला आहे का, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.
