संजय राऊत यांनी उद्धव साहेबांना धृतराष्ट्र बनवले – सदाभाऊ खोत

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक असे जोरदार युद्ध रंगले आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर काल खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. त्यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.कालच्या प्रकरणामुळे राजकीय वाद सुरु झालेला असतानाच आज पुन्हा एकदा रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

महाभारतामध्ये संजय धृतराष्ट्राला रणांगणावरील माहिती देण्याचे काम करत होता. कलियुगात मात्र संजय राऊत चांगले असणाऱ्या उद्धव साहेबांना धृतराष्ट्र बनवत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी बोचरी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.संजय राऊत यांनी आम्हाला अस्तित्व नसलेले पक्ष म्हणून हिणवले होते. मात्र, त्याच संजय राऊत यांच्या पक्षाची आज काय अवस्था झाली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडी नसून चोरांची टोळी आहे. जागा वाटपाच्या चर्चा नसून वाटणीची चर्चा सुरू असल्याची टीका देखील यावेळी खोत यांनी केली.

काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांचे शिवसेना ही महाविकास आघाडी नसून महाग चोरांची टोळी आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. जागा वाटपाच्या चर्चा नसून वाटणीची चर्चा सुरू असल्याची खोचक टोलादेखील यावेळी खोत यांनी त्यांना लगावला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांच्या नंतर आता रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी देखील दोन लोकसभेच्या जागांवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.त्यामध्ये हातकणंगले मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे जागा वाटपामध्ये आपण मागणार असल्याची माहिती यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. त्यामुळे आता यावरून भाजप काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.