शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची अरे तुरेची भाषा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पडळकर टीका करत असतात. यावेळीही त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. ही टीका करत असताना गोपीचंद पडळकर यांनी पवारांचा एकेरी उल्लेख करत अरे तुरेची भाषा केली. पवारांबाबत बोलताना पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली आहे. शरद पवार यांना मस्ती आलीय, असं ते एकेरी उल्लेख करताना म्हणाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रविवारी (४ जून) सोलापूरमध्ये मंद्रूप येथे धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत अरेरावीची भाषा केली आहे. त्याच्या या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी पवारांनी मस्ती केली.यावर्षी पवार का नाही आला. पवार चार वेळा मुख्यमंत्री होता. बारा वर्षे केंद्रात मंत्री होता. तो पण आता होता मागं कधी होता मला माहिती नाही, असा एकेरी भाषेत उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला.’गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती. त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी जागृत ठेवली पाहिजे’, असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केलं आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, रोहित पवार हे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात. त्यांच्या दावणीला किती कोंबड असतात, हे तुला माहिती नाही का माकडा?, असे म्हणत पडळकर यांनी रोहित पवार यांचा माकड असा उल्लेख केला. धनगर समाज काय उपाशी आहे, जो तुम्ही प्रसाद वाटताय. धनगरांच्या घरी पाहुणे आले तरी कोंबड कापतात. तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोला पडळकरांनी रोहित पवारांना लगावला.