भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याची कुजबुज राजकीय नेत्यांमध्ये सुरू आहे. निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याची तयारी सुरु झाली आहे. परंतु पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येतं आहे ह्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन पावले मागे घ्यावी लागणार का? असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
मागितलं आठवडाभरापूर्वी अजित पवार यांनी पुणे लोकसभा पोटनिडणुकीच्या जागेवर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत त्यानुसार या जागेचा निर्णय होईल. परंतु शनिवारी मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
काँग्रेसच्या बैठकीमध्ये आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणे टाळले असल्याचं बोलले जात आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन पावले मागे आले आहे. परंतु दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांसह हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांच्यावर दिली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय कमिट्यांचा आढावा घेऊन त्याची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आले आहे. या बूथनिहाय कमिट्याची जबाबदारी तुपे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे पोटनिडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
