बीआरएसची भीती पवार आणि काँग्रेसला, भाजपला नाही – चंद्रशेखर बावनकुळे

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी गोष्ट तयार करत आहेत. राजकारणात कोणीही नवं आलं की ‘बी टीम’ म्हणता. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती भाजपची ‘बी टीम’ नाही, बीआरएसशी आमचे देणेघेणे नाही. पण, राज्यात नवीन पक्ष आला की त्याची शरद पवार आणि काँग्रेसला भीती वाटते, बीआरएसशी आम्हाला काही देणे घेणे, असे परखड विधान बावनकुळे यांनी केले.

एका परिवारातल्या दोन भावांमध्ये काही कारणाने मतभेद होत असतात. पण फेविकॉल का जोड पक्का आहे. शिवसेना-भाजपचा जोड फेविकॉलचा आहे. तो कधीही तुटणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजप-शिवसेनेमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

भाजपचा प्लॅन जयंत पाटलांनी माहित झालं असेल तर काय.. .गोपनीय पद्धतीने भाजपच्या बैठकीला जयंत पाटील आले असतील. ते कसे आले कुठे आले त्यांना विचारा, असं म्हणत जयंत पाटलांनाही बावनकुळे यांनी टोला लगावला आहे.मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. 2014 ते 2019 च्या निवडणुकांमध्ये जो जाहीरनामा दिला गेला त्याप्रमाणे सरकारने काय काम केलं ते राज्यातल्या 3 कोटी घरापर्यंत पोहोचणार आहोत.संपर्क ते समर्थन आणि घर चलो अभियान, संपर्क ते समर्थनमध्ये आम्ही महत्वाच्या 1 हजार लोकांचा घरी भेटी देतो आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले, ‘२०२४ नंतर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करून आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपदी बसवायचे, असे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना याची कुणकूण लागल्याने शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते तर दुसरीकडे अजित पवार मंत्रालयात बसून राष्ट्रवादीची कामे करत होते. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून येण्याचे ध्येय ठेवले होते.’