गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत वेगवेगळ्या कारणाने फूट पडताना दिसत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत आहे कि नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे त्यामुळे जनतेचा मविआवरचा विश्वासही कमी होताना दिसत आहे तसेच गेल्या काही काळापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या काही दिवसापासून टिका-टिपणी आणि शाब्दिक चकमक घडत आहेत
काल ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला त्यात संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंची इच्छा असेपर्यंत महाविकास आघाडी टिकेल असे विधान संजय राऊत यांनी केलं होतं त्यानंतर अजित पवार यांनीही त्याच्यावर खोचक प्रतिउत्तर दिलं होतं संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना ते महाराष्ट्रातील बिग बी आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आहे असे विधान केले आहे.
काल शिवसेनेच्या मेळावा होता त्या मेळाव्यात जसे विचार मांडायला हवे तसा तो आम्ही मांडला आहे शिंदे-मिंधिनकडे च फेवकॉलचा जोड असतो असं नाही माविकास आघाडी महाविकास आघाडी ही पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ टिकावी पण एवढंच सांगितलं की तुमची इच्छा आहे तोपर्यंत टिकणार म्हणजे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ टिकणार असेही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिला आहे
संजय राऊतांच्या विधानावर काय म्हणाले अजित पवार
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की प्रत्येकाला आपला -आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे आजच्या घडीला आम्ही तिघे एकत्र आल्याशिवाय भाजप आणि शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे आमची आघाडी पंचवीस वर्षे टिकणार आहे तेव्हा पंचवीस वर्षे टिकेल असं वाटत होतं आता पुढे त्यांना एकट्याच सरकार यावं असं वाटत असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही
