27 जुलै हा दिवस देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा -नितेश राणे

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेलाच पत्र लिहिले आहे. यात आजचा दिवस म्हणजेच २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. याला आता भाजप नेते नितेश राणे यांनीही जशात तसे उत्तर दिले आहे. २७ जुलै हा ‘देशद्रोही दिवस’ ​​म्हणून घोषित करा, अशी मागणी नितेश राणेंनी युएनकडे केली आहे.कृपया २७ जुलै हा देशद्रोही दिवस ​​म्हणून घोषित करा. आजवर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या सर्वात मोठ्या गद्दारांपैकी एक या दिवशी जन्माला आला. महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती असलेल्या आपल्याच वडिलांच्या पाठीत त्याने वार केले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी काही दिवसाआधी माध्यमांशी संवाद साधला होता ते बोलताना म्हणाले संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत एवढे भामटे आहे की स्वतःच्याच कार्यकर्त्याकडून स्वतःला धमकी देण्याचा प्रकार यांनी केला आहे. हे असं खोटं बोलूनच पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. संजय राजाराम राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. त्यामुळेच मी त्याला भांडुपचा देवानंद म्हणतो. कारण खोटं बोलणं आणि गद्दारी करणं यापेक्षा हा काही करत नाही. कार्यकर्त्याकडूनच धमकीचा फोन करायला लावायची, धोका आहे सांगायचं आणि जीवाला धोका आहे सांगायचं. त्यानंतर गृहमंत्री फडणवीसांवर टीका करायची हे याचं धोरण आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याच्या आपल्या घाणेरड्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी भाजपसारख्या जवळच्या मित्राच्या पाठीत स्वतःच्या धर्मावर वार केले. त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भ्रष्टाचार करून करोडो पैसे कमवले.म्हणून मी २७ जुलै हा दिवस देशद्रोही दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन करत आहे कारण आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा देशद्रोही या दिवशी जन्माला आला होता. म्हणून जग त्याला आठवते आणि दररोज त्याला शाप देते, अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.