नवाब मालिकांच्या वाढदिवशी गद्दार दिन योग्य; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला टोला

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केलेल्या गद्दार दिनावरून टोला लगावला आहे. नवाब मलिक यांच्या वाढदिवशी गद्दार दिन साजरा करून अतिशय योग्य केले असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय योग्य दिवशी जागतिक गद्दार दिन साजरा केला, याबद्दल त्यांचे नितांत आभार! उशीरा का होईना, राष्ट्रवादीला उपरती झाली आणि त्यांनी नवाब मलिकांचा वाढदिवस ‘जागतिक गद्दार दिवस’ म्हणून साजरा केला. नवाब मलिकांना जागतिक गद्दार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ज्या दिवशी बंड केले तो दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यातील अनेक शहरात आंदोलन करत गद्दार दिन साजरा करण्यात आला. यावरून चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.