टेस्ला आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. भारतात गुंतवणूक करण्याविषयी त्यांच्याl चर्चा झाली. टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली. मोदी हीरो आहेत, त्यांना भारतासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असंही मस्क म्हणाले. तसेच मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे देखील मस्क यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत पोहचल्यावर विविध क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान यांचा समावेश आहे.लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारत भेटीची इच्छा व्यक्त केली. पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे सांगत एलॉन मस्क म्हणाले की, मी भारताच्या भविष्याबाबत खूप उत्सुक आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत.पंतप्रधान मोदींना भारताच्या उज्जवल भविष्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. नवीन कंपन्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन, धोरण उदारमतवादी आहे. मोदीं भारतात नवीन कंपन्यांचे स्वागत खुल्या हातांनी करतात त्यामुळे मी त्यांचा फॅन आहे.
पंतप्रधानांनी यापूर्वी २०१५ मध्ये कॅलिफोर्नियातील एलोन मस्कच्या टेस्ला मोटर्स कारखान्याला भेट दिली होती. त्यावेळी ते ट्विटरचे मालक नव्हते. इलॉन मस्कसोबत पंतप्रधानांची भेट अशा वेळी झाली जेव्हा टेस्ला भारतात आपला कारखाना सुरू करण्यासाठी जागा शोधत आहे.इलॉन मस्क व्यतिरिक्त पीएम मोदींनी लेखक रॉबर्ट थर्मन आणि सांख्यिकीतज्ज्ञ निकोलस नसीम तालेब यांचीही भेट घेतली आहे. एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की, भारताच्या भविष्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाबद्दल खूप प्रेम आणि काळजी आहे. म्हणूनच ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
