माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स

औरंगजेबाच्या फोटो किव्हा बॅनर वरून महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या तणाव आणि दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील वादग्रस्त औरंगजेबाच्या समाधीवर पोहोचले तेव्हा तणाव कमी झाला नव्हता. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाशी औपचारिक समझोता करून युती जाहीर केली होता. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला (शिंदे) त्यांच्या या खेळीने संजीवनी मिळाली.भाजप-सेना ह्या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंच्या ‘हिंदुत्वा’ला आव्हान देत त्यांच्याकडून या मुद्द्यावर स्पष्टीकरण मागितले.
त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मी येथे पर्यटन स्थळ म्हणून आलो आहे. ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या नावाने दंगली पेटवण्याचा काम सुरू आहे, मला त्यांना सांगायचे आहे, औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केले, ते कोणीही पुसून टाकू शकणार नाही.

काय म्हणाले भाजप-सेना नेते

यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकरांनी पापी औरंगजेबाच्या कबरीला अभिवादन केले आहे, हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान आहे.
दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. यापूर्वी ते ‘औरंगजेबी’ पक्ष AIMIM चे सहयोगी राहिले आहेत. ते असेच करत राहिले तर बाकीचे समर्थकही त्यांना सोडून जातील.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. आंबेडकरांच्या या कृतीवरून भाजपने आंबेडकरांवर टीका केली आहे. तसेच आंबेडकरांची ही कृती मान्य आहे काय? याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हानच भाजपने उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून भाजपने आंबेडकर आणि ठाकरे यांना घेरलेलं असतानाच मुंबईत लागलेल्या एका बॅनर्सने खळबळ उडाली आहे. हे बॅनर्स कुणी लावले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे

बॅनर्सची शिवसैनिकांनी किंवा इतर कुणची पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी पोलीस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. तशी माहिती डीसीपींनी दिली आहे. या बॅनर्समुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही डीसीपीने दिला आहे.

माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले आहेत. मध्यरात्री अज्ञात इसमाने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी हे बॅनर्स पाहिल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरू झाली. स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हे बॅनर्स हटवले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कुणी तरी हा खोडसाळपणा केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अशा प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

या बॅनर्सवरील भाषा अत्यंत आक्षेपहार्य आहे. औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे… शिवरायांची जनता, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. तसेच असा हॅशटॅग या बॅनर्सवर वापरण्यात आला आहे. तसेच या बॅनर्सवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला आहे.