तप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. विविध राजकीय कार्यक्रमांदरम्यान आज त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना आणि मोदींनी अध्यक्षांसह फर्स्ट लेडी यांना काही भेटवस्तू दिल्या. नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा ग्रीन डायमंड दिला. तर अध्यक्ष जो बायडेन यांना चंदनाच्या लाकडापासून बनलेली पेटी भेट म्हणून दिली आहे. या पेटीत त्यांच्यासाठी अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा गिफ्ट दिला. हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे. कारण या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हाईट हाऊसमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलं. फर्स्ट लेडीने केलेल्या या आदरतिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आभार मानले आहेत. जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी जा व्हाईट हाऊसमध्ये माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या वतीने अध्यक्ष जो बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची एक झलक पाहायला मिळते. त्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये विविधतेने नटलेल्या भारतातील विविध राज्यांची ओळख असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.
या भेटवस्तू दिल्या
महाराष्ट्राचा गुळ
उत्तराखंडचे तांदूळ
तामिळनाडूचे तिळ
कर्नाटकातील मैसूरमधील चंदनाचा तुकडा
पंजाबचे तूप
राजस्थानमधील हाताने बनवलेलं 24 कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, तसेच 99.5 टक्के कॅरेट चांदीचे नाणे
पश्चि बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ
गुजरातचे मीठ, श्रीगणेशाची मूर्ती तसेच दिवा
