राज्यात पावसाची दमदार हजेरी; हवामान विभागाकडून उद्या महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

मृ ग नक्षत्र लागून 10 दिवस होऊन गेले आहेत. परंतु अजूनही भुई भेगाळलेलीच असून राज्यभर पेरण्या, लागवडी पुरेशा पावसाअभावी रखडल्या आहेत. राज्याच्या बहुतांश भागात पावसाने अजूनही हजेरीच लावलेली नाही.त्यामुळे खरीपाच्या 142 लाख हेक्टरपैकी केवळ एक लाख 44 हजार हेक्टरवर अर्थात खरीप पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी केवळ 1.29 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. बहुतांश धरणे तळ गाठून आहेत. विहिरी, तलाव कोरडे पडल्याने बागायती फळे-भाजीपाला अशी पिकेही धोक्यात आली आहेत.

पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस अधिक वाढत होत चालले आहे.पाऊस लवकर आला नाही लांबलेल्या पावसाचे परिणाम केवळ पेरण्या खोळंबणे, पाणीटंचाई एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांचे खरीप पेरणी नियोजन बिघडणार आहे.अशी चिंता शेतकऱ्यांना होती हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहे

मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. 27 जून मंगळवारी रोजी म्हणजे उद्यासाठी राज्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता.

मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या भागांमध्ये आज देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी पावसाचा जोर थोडा ओसरला होता, मात्र सोमवारी पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.