घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू

पहिल्या पावसाने मुंबईत जलमय झाली आहे. अशातच काल मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी ही इमारत कोसळली. यात चौघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं. पण या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांसाठी कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं. आज या दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसंच एक कुत्राही या इमारतीत अडकला होता. त्याचाही मृत्यू झाला आहे.

दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचलं. तर पावसाच्या पहिल्या दिवशी विद्याविहारमधील इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ठिकाणी तब्बल 20 तास एनडीआरएफ रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. 20 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आलं या दोघांवर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.

घाटकोपरमधल्या राजावाडी परिसरातील चित्तरंजनगरमध्ये काल सकाळी 9 वाजेच्या सुमारात इमारत कोसळली. राजावाडी कॉलनीमधील बिल्डिंग नंबर बी / 7 /166 ही तीन मजली इमारत कोसळली.इमारतीच्या जमिनीचा काही भाग खचल्याने वरच्या तीन मजल्यांनाही तडे गेले. या इमारतीत 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. फायर ब्रिगेडचे जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं.

विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयात शेजारील दोन मजली इमारतही काल कोसळली होती. इमारतीच्या ढिगार्‍यातून पाच जणांना बाहेर काढण्यात आले होते. या पाचही जणांवर मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र यामधील २ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.