संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे -आमदार नितेश राणे

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. नितेश राणे आणि संजय राऊत एकमेकांवर टीका करत असतात. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आपल्या मंत्रिमंडळ आमदार, खासदार, बीआरएसचे पदाधिकारीसह ६०० गाड्याचा ताफा घेऊन यांना घेऊन पंढरपूरला येऊन विठ्ठालाचं दर्शन घेतलं.त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘बीआरएस ही बीजेपीची बी टीम आहे.असं ते म्हणतात मात्र स्वतः संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे.असं म्हणत खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले की तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेतलं. हे संजय राऊत आणि त्यांच्या मित्र पक्षांना फार झोंबतय. बीआरएस ही बीजेपीची बी टीम आहे. असं ते म्हणतात मात्र स्वतः संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे. तर त्यांचा उबाठा लवकरच राष्ट्रवादीमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने लोकांना बी किंवा सी टीम म्हणता.’

भाजप आमदार नितेश राणे यांनी यावेळी शिवसेना उबाठा गटाचं कार्यालय तोडलं त्यावरून देखील ठाकरे आणि राऊतांवर टीका केली की, कंगणा रनौत, राणा दाम्पत्य, आमचं राणेंच घर तोडण्यासाठी ही प्रयत्न करायचे तेव्हा सगळे आदेश वर्षावरून यायचे. त्यामुळे तुम्ही शाखा तोडल्यावर भाजप-शिंदेंना नीच म्हणण्यापेक्षा तुम्हीच नीच आहात असं टीकास्त्र राणेंनी यावेळी सोडलं.

तसेच ते पुढे म्हणाले की देशात लोकशाही आहे. कोणीही कुठेही जाऊन मतं मागू शकतं. तसेच हे लोक एकीकडे संविधान बचाव म्हणायचं आणि दुसरीकडे हुकुमशाहीसारखं वागता. उबाठा देखील भाजपसोबत युती असताना अनेकदा परराज्यात निवडणुका लढवत होते. पण तुमचे डिपॉझिट जप्त होत होते. तेव्हा तुम्हाला कोणी ही विचारलं नाही. की कशाला जाता परराज्यात? तर आता दुसऱ्यांना प्रश्न विचारू नका.असेही नितेश राणे म्हणाले आहेत