कामगिरी सुधारा, अधिक आक्रमक व्हा, ‘सुमार’ मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचे आदेश’

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे आहे, त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांनी त्यांच्या कामगारीत सुधारणा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी त्यांनी सर्व मंत्र्यांना वरील आदेश दिले.

दरम्यान राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शासकीय निवासस्थान पर्णकुटी इथे काल रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. सोबतच स्नेहभोजन देखील पार पडलं. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.

“जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा. जर राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा. तसेच सरकारमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवा. काही निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. तसेच आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कामे प्राधान्याने करा,” असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना दिला आहे.